इतिहास

भाजप इतिहास

भाजप आणि रा स्व संघ (आरएसएस) चा उगम

आजच्या घडीला, भारतीय जनता पक्ष हा “संघपरिवार” नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थांच्या कुटुंबातील एक सर्वात महत्वाची सदस्य संस्था असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मार्फत ती जोपासली जाते. रास्वसंघा प्रमाणेच भाजपसुध्दा, गेली हजारो वर्षे भारताचे व भारतीयांचे प्रतिक असलेल्या गोष्टींशी, म्हणजेच एकता आणि प्रामाणिकपणा, या देशाची स्वाभाविक ओळख आणि सामाजिक ताकद, व्यक्तिगत स्वरूप आणि सांस्कृतिक आगळेपण, बध्द आहे.

इतिहास म्हणजे त्या त्या देशाचे तत्वज्ञान! संघपरिवारावरून आपल्याला अगदी स्पष्टपणे भारतीय इतिहासाची कल्पना करता येते. खूप पूर्वी इथे एक अशी संस्कृती अस्तित्वात होती जिचा प्रसार श्रीलंकेपासून तिबेटपर्यंत, दक्षिणपूर्व आशियापासून ते मध्य आशियापर्यंत आणि हिंदी महासागराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत झाला होता आणि या भागांत तिचे ठसे उमटलेलेही दिसत होते. ग्रीक आणि हूणसारख्या हल्लेखोरांपासून तसेच शक व तुर्क आणि अफगाणी इस्लाम सैन्यांपासून बचाव करून ही संस्कृती टिकून राहिली. परकीय अत्याचाराला विरोध करून लढत, तिचे अस्तित्व संपवण्यासाठी करण्यात येणाऱ्या अनेक प्रयत्नांना हाणून पाडत किंवा अशाप्रकारच्या इतर अनेक आव्हानांना यशस्वीपणे तोंड देत, या संस्कृतीने आणि सभ्यतेने स्वत:ला जिवित ठेवले. विजयनगरी साम्राज्य, पराक्रमी महाराणा प्रताप, झुंजार राजा शिवाजी, गुरू गोविंद सिंग ही भारताच्या थोर ऐतिहासिक वीर परंपरेची साक्ष देणारी उदाहरणे आहेत.

त्यानंतरच्या काळांत स्वामी दयानंद आणि स्वामी विवेकानंद यांनी भारताची ओळख निर्माण करण्याची आणि राष्ट्रीयत्वाची ज्योत तेवत ठेवण्याची कामगिरी केली आणि गेल्या शतकांत महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, श्री. अरविंदो आणि अन्य कितीतरी लोकांनी आपल्या मातृभूमीसाठी आपले जीवन वेचले. १९२५ मध्ये डॉ. हेडगेवार यांनी रास्वसंघाची स्थापना केली आणि १९४० नंतर श्री. गुरूजी एम. एस. गोळवलकर यांनी या संघाला मजबूती आणली. रास्वसंघाची मनोधारणा ही आहे की ते भारताच्या थोर वीर परंपरचे अनुयायी आणि वारसदार आहेत. “सर्वांना न्याय देणे आणि कुणाचाही अनुनय न करणे” या तत्वावर ठाम विश्वास असलेला रास्वसेसंघ नि:शंकच हिंदुत्वाची आणि आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि तो आपल्या देशाचा आणि भारतीय समाजाचा आधारस्तंभ आहे असे नि:शंकपणे म्हणता येईल. आपल्या संस्कृतीची आणि भारतीय असल्याची ओळख सर्व भारतीयांपर्यंत, मग ते कोणत्याही धर्माचे किंवा संप्रदायाचे असोत, पोहोचवण्याची कामगिरी रास्वसंघाकडून केली जाते. भारतातल्या नागरिकांचा धर्म कोणताही असो किंवा त्यांचे पूजास्थान आणि ईश्वराची पूजा करण्याची पध्दत कोणतीही असो, रास्वसंघासाठी सर्व भारतीय समानच आहेत.